नेटभेटच्या एका वाचकाने मला ईमेल द्वारे "ऑर्कुटवरील आल्बममधील फोटो डाउनलोड कसे करावे" यासंबंधी माहिती विचारली होती. नेटभेटच्या ईतरही सर्व वाचकांना ही युक्ती कदाचित उपयोगी पडेल म्हणुन आज या लेखाद्वारे मी ही माहिती वाचकांना देत आहे.
ऑर्कुटवरील फोटोंची चोरी अथवा गैरवापर केला जाउ नये म्हणुन फोटो डाउनलोड करण्यास बंदी आहे. म्हणुनच मी वाचकांना विनंती पुर्वक सांगु इच्छीतो की कृपया या युक्तीचा गैरवापर करु नका.
1. ऑर्कुट.कॉम वर लॉग-इन करा.
२. जो फोटो डाउनलोड करायचा आहे तो आल्बममध्ये जाउन सीलेक्ट करा.
३. आता हा फोटो मुळ आकारात दीसेल. (खालील चित्र पहा)
४. फोटो डाउनलोड करण्यासाठी आपण Right Click करुन त्यानंतर Save as वर क्लिक करतो. मात्र ऑर्कुटमध्ये फोटोवर Right Click करता येत नाही.
५. ईथेच आपण आपली युक्ती वापरुया. फोटोवर Left click करुन वरील Address Bar मध्ये फोटो ड्रॅग करा. असे केल्यावर फोटो एका नविन विंडोमध्ये उघडेल.
६. आता नेहमीप्रमाणे फोटोवर Right Click करुन त्यानंतर Save image as वर क्लिक करा आणि फोटो डाउनलोड करा.
Sunday, 24 January 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment