सलग सात वेळा टुर दे फ्रान्स (Tour De France) ही जगातील सर्वात कठीण समजली जाणारी सायकल शर्यत जिंकणारा लान्स आर्मस्ट्राँग हा क्रीडापटु म्हणजे एक अजब रसायन आहे. टुर दे फ्रान्स सलग सात वेळा जिंकणारा लान्स अॅडवान्स स्टेज्ड कॅन्सरने पीडीत होता. लान्सच्या बर्या होण्याची शक्यता डॉक्टरांनी देखील फेटाळली होती मात्र प्रखर ईच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर वर मात करुन लान्स आर्मस्ट्राँग जगज्जेता ठरला.
वयाच्या २६ व्या वर्षी लान्सला टेस्टीक्युलर कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या वेळेपर्यंत कॅन्सर त्याच्या जठर, फुफ्फुसे आणि मेंदुमध्ये पसरला होता. अनेक ऑपरेशन्स आणि शरीर व मनाला अशक्त करणार्या केमोथेरपीसारख्या अवघड ट्रीटमेंट नंतर लान्स कॅन्सरच्या विळख्यातुन बाहेर पडला.
एका दीर्घ आजारातुन बाहेर पडल्यानंतर लान्स आर्मस्ट्राँगने १९९८ मध्ये पुन्हा टुर दे फ्रान्स मध्ये पुनरागमन केले. तब्बल २१ दिवस चालणार्या या शर्यतीमध्ये ३५०० किलोमीटर इतके अंतर पार करावे लागते. एवढे अंतर पार करुन १९९९ नंतर सलग आत वेळा लान्सने टुर दे फ्रान्सचे अजिंक्यपद पटकावले. या त्याच्या पराक्रमामुळेच लान्स आर्मस्ट्राँग हा आजपर्यंतच्या सर्वोत्तम क्रीडापटुंच्या श्रेणीमध्ये गणला जातो.
आपल्या असंख्य चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी लान्सने twitter चा पर्याय निवडला आहे. @lancearmstrong हे युझरनेम वापरुन लान्स ट्वीटींग करतो. ट्वीटरवर लान्स त्याचे दैनंदीन जीवन, प्रवास, सायकलींग आणि कॅन्सरपीडीतांना मदत करण्यासाठी त्याने चालु केलेल्या लाइव्हस्ट्राँग (LiveStrong) या संस्थेबद्दल बोलत असतो. ट्वीटरवर आजतागायत लान्सचे २३८११२५ इतके फॉलोअर्स आहेत.
लान्स सारख्या सुप्रसिद्ध खेळाडुने आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी ट्वीटरचा वापर केला हा ट्वीटरचा आणि एकुणच तंत्रज्ञानाचा मोठा गौरव आहे.
अनेक मोठ्या माणसांबद्द्ल आपण टीव्हीवर पाहतो, पुस्तकात वाचतो परंतु अशा अनेक मोठ्या व्यक्तींच्या प्रत्यक्ष संपर्कात राहुन त्यांच्या दैनंदीन जीवनातील गोष्टी जाणुन घेण्याची संधी आपल्याला क्वचीतच मिळते. ट्वीटरच्या माध्यमातुन आज हे साध्य होउ शकते, याचा जरुर फायदा घ्या.
0 comments:
Post a Comment