बर्याचदा संगणक चालु केल्याकेल्या पहिल्यांदा ईंटरनेट चालु केला जातो. आज आपण एक अशी युक्ती पाहणार आहोत ज्यामध्ये संगणकाचा वॉलपेपरच इंटरनेटचं काम करतो. अगदी सोपी आणि मजेशीर गोष्ट आहे ही. नाही का?
तुमच्या आवडीच्या कोणत्याही वेबपेजला लाइव्ह वॉलपेपर मध्ये रुपांतरीत करण्याची पद्धती खालीलप्रमाणे -
१. डेस्कटॉपवर Right Click करुन properties मध्ये जा.
२. Display Properties ची विंडो उघडेल. त्यामध्ये Desktop या टॅब मध्ये जा.
३. आता चित्रात दाखवील्याप्रमाणे Customize desktop या बटणावर क्लिक करा.
४. यामध्ये web चा पर्याय निवडा. येथे My current homepage चा पर्याय निवडा.(बहुदा गुगलच असेल !)
५. Ok वर क्लिक करा आणि Display Properties च्या मुख्य विंडोमध्ये apply आणि Ok वर क्लिक करा.
आता डेस्कटॉप पहा , तुमची आवडती वेबसाईट चक्क वॉलपेपरच्या स्वरुपात अवतरलेली दीसेल.
जर होमपेजव्यतीरीक्त इतर कोणती वेबसाईट वॉलपेपर म्हणुन वापरायची असेल तर वरील स्टेप ३ नंतर "New" चा पर्याय निवडा आणि नविन वेबसाईटची वेबलिंक द्या. अशा प्रकारे कोणतीही वेबसाईट वॉलपेपर म्हणुन ठेवता येईल आणि अगदी वेबब्राउजरमध्ये वाचल्याप्रमाणे वाचता देखील येईल.
आणखी एक गंमत -
जर अशा प्रकारे http://www.bing.com/ ही मायक्रोसॉफ्टची सर्च साईट वॉलपेपर म्हणुन ठेवली तर दररोज बदलणारा वॉलपेपर आणि सर्च इंजिन असे दोनही फायदे मिळवता येतात.
वॉलपेपर म्हणुन ठेवलेल्या वेबसाईटवर वरच्या बाजुला माउस नेल्यावर एक करड्या रंगाचा पट्टा आणि डाव्या बाजुला एक छोटा त्रिकोण दीसतो. त्यावर क्लिक केल्यास विविध पर्याय दीसतील.
यापैकी मुख्य दोन पर्याय आणि त्यांचा उपयोग खालीलप्रमाणे -
Cover Desktop -
Split Desktop with Icons -
लाईव्ह वेबपेजला आपल्या संगणकाचा वॉलपेपर बनवुन स्वतःचा वेळ तर वचवाच पण त्यासोबत इतरांना अचंबीतही करा.
0 comments:
Post a Comment