वाचकहो, मराठी ब्लॉगींगला जगभर पसरलेल्या मराठी रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार्या नेटभेट ई-मासिकाचा जानेवारी २०१० चा, म्हणजेच या वर्षातील पहिला अंक प्रकाशित करण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे. नेटभेट मासिकाला केवळ चार महिन्यात जो प्रतीसाद मिळाला त्यामुळे आम्ही खुप समाधानी आहोत.
ब्लॉग लेखकांनी आपापले उत्कृष्ट लेख या मासिकासाठी देऊ केले आणि वाचकांनी ई-मासिक ऑनलाईन वाचुन आणि डाउनलोड करुन प्रतीसाद दीला याबद्दल आम्ही आभारी आहोत.
रसिक वाचकांनी वेळोवेळी ईमेलद्वारे प्रतीक्रीया कळवुन आम्हाला प्रोत्साहीत केले. ब्लॉग्जमधील उत्कृष्ट लेखांचे संकलन करुन ई-मासिकाच्या स्वरुपात प्रकाशीत करण्याची ही अभिनव कल्पना आवडल्याचे अनेक वाचकांनी आम्हाला कळवले. डाउनलोड करता येत असल्याने आपल्या सवडीनुसार मासिक वाचता येते हा महत्त्वाचा फायदा वाटतो आणि सहजगत्या ई-मासिक झुम (Zoom) करता येत असल्याने वृद्ध व्यक्तींना मोठ्या फाँटमध्ये हे मासिक वाचायला आवडले असे देखिल काही वाचकांनी कळवले.
ई-मासिकामध्ये शुद्धलेखनाच्या चुका आढळल्याचे काही वाचकांनी निदर्शनास आणून दीले. आणि म्हणुनच यापुढे या चुका टाळण्यासाठी मी सर्व ब्लॉगर्सना (माझ्यासहित !) शुद्धलेखनाकडे विशेष लक्ष देण्याची विनंती करतो आहे.
नेटभेटला नव्याने जोडले गेलेले सर्व वाचक ईमेल द्वारे यापुर्वी प्रकाशीत झालेल्या अंकांची मागणी करतात मात्र वेळेअभावी सर्वच ईमेल्सना उत्तर देणे शक्य होत नाही. वाचकांच्या सोयीसाठी नेटभेट ई-मासिकाचे आतापर्यंत प्रकाशीत झालेले सर्व अंक ऑनलाईन वाचण्यासाठी तसेच डाउनलोड करण्यासाठीची लिंक आम्ही एकाच पानावर उपलब्ध करुन देत आहोत. त्या पानावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
नेटभेट मासिकाबद्दल आपल्या प्रतीक्रीया, सुचना आम्हाला नक्की कळवा.
नेटभेट ई-मासिक जानेवारी २०१०
0 comments:
Post a Comment