300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Monday, 28 December 2009

Tagged under: , ,

eDiary 2010


नविन वर्षाच्या संकल्पांपैकी नेहमीचा असा एक संकल्प म्हणजे डायरी लिहिण्याचा. अगदी उत्साहात नविन डायरी लिहिण्याचा संकल्प आपण मांडतो पण आपल्यापैकी बर्‍याच जणांचा उत्साह पहील्या दोन आठवड्यांपेक्षा जास्त टीकत नाही.
मुळातच पेन-डायरी हातात घेउन रोजच्या रोज डायरी लिहिण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही हे आपल्याला मान्य केलेच पाहिजे. म्हणुनच कितीही इच्छा असली तरी नियमीतपणे डायरी लिहिली जात नाही. दुसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे डायरी लिहिली तरी इतरांपासुन ती लपवुन ठेवण्याची. अगदी कितीही जवळची व्यक्ती असली तरी डायरी अशा व्यक्तीने वाचलेली आपल्या कुणालाच आवडणार नाही. या प्रॅक्टीकल कारणांमुळे डायरी लिहीणे मागे पडत राहीले तरी देखील डायरी लिहिण्याचे अन्य फायदे पाहता "डायरी" लिहण्याचा संकल्प सोडणे नेहमी चांगलेच.
या सर्व अडचणींवर मात करुन डायरी लिहिण्यासाठी आज मी तुम्हाला काही सोपे ईलेक्ट्रॉनीक डायरीचे प्रकार सांगणार आहे. तुमच्या संगणकावरच एक सोपी डायरी असली की मग चिंताच नाही.
पहिला आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे Notepad फाईल.
Start → Programs → Accessories → Notepad येथे जाउन नोटपॅड फाईल उघडता येते. एक नोटपॅड फाईल उघडा त्यामध्ये .LOG असे लिहा (कॅपीटल मध्ये). आणि फाईलला काही नाव देउन (उदाहरणार्थ - Diary 2010) सेव्ह करा.
आता यापुढे कधीही फाईल उघडल्यावर नविन तारिख आणि वेळ दीसु लागेल. येथे आपल्या डायरीतील मजकुर लिहुन सेव्ह करा. पुन्हा फाईल उघडल्यावर नविन तारिख सुरु.

मात्र या डायरीला पासवर्ड देउन सुरक्षीत करता येत नाही. यासाठी आणखी एक उपाय म्हणजे ईलेक्ट्रॉनिक डायरी सॉफ्टवेअर.
गुगलवर सर्च केल्यास अनेक फ्री डायरी सॉफ्टवेअर्स मिळतील. मी मात्र Efficient Diary नावाचे एक सॉफ्टवेअर वाचकांना सुचवेन.
Efficient Diary ची काही प्रमुख वैशीष्ट्ये -
  • सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे या डायरीला पासवर्डच्या सहाय्याने या डायरीला सुरक्षीत ठेवता येते.
  • या डायरीमध्ये असलेल्या सर्चच्या सुविधेमुळे कोणत्याही पानावरचा मजकुर शोधता येतो.
  • चित्रे, फोटोग्राफ्स, आणि वेगवेगळ्या अ‍ॅटेचमेंट्स जोडता येतात.
  • डायरीला कलरफुल बॅकग्राउंडने , emotion icons, चित्रे, हायपरलिंक्स इत्यादी वापरुन सजवता येते.

येथे क्लिक करुन Efficient Diary हे मोफत सॉफ्टवेअर डाउनलोड करता येईल.
या डायरीमधील एकमेव तोटा म्हणजे ही डायरी फक्त संगणकापुरतीच मर्यादीत असते. म्हणजे जर संगणक बिघडला किंवा तुम्ही तुमच्या संगणकापासुन दुर असलात तर डायरी लिहीण्यात खंड पडेल. यासाठी मी तुम्हाला तिसरा उपाय सुचवेन तो म्हणजे ऑनलाईन डायरीचा.
ब्लॉगिंग हा ऑनलाईन डायरीचा एक प्रकार तुम्हाला माहित असेलच. पण तुम्ही विचाराल डायरी ही तर खुप व्यक्तीगत खाजगी गोष्ट आहे पण ब्लॉगतर इतर सर्वजण वाचु शकतात. पण मित्रांनो आपल्या ब्लॉगला जगापासुन लपवुन ठेवण्याची सोय देखील आहे बरं का!
तशी ही सुविधा जवळपास सर्वच ब्लॉगींग सर्वीसेसमध्ये आहे मात्र आपण उदाहरणादाखल ब्लॉगर.कॉम या सर्वाधिक लोकप्रीय सुविधेबद्दल बोलुया.
  • blogger.com वर जाउन आपल्या दैनंदीनीसाठी एक नविन ब्लॉग चालु करा.
  • आता settings → Permissions मध्ये जाउन Blog readers साठी only blog authors हा पर्याय निवडा.


  • व त्यानंतर Settings → Basic मध्ये जाउन add your blog to listings आणि Let search engines find your blog या दोनही पर्यायांसमोर NO असे लिहा.व सेव्ह करा.



यापुढे ब्लॉगवर लिहिलेली प्रत्येक पोस्ट ही फक्त आणि फक्त तुम्ही पाहु शकता.
पण ब्लॉगवर लिहल्यामुळे सुरक्षीततेचा आणि डायरीच्या उपलब्धतेचा प्रश्न सुटतो. डायरी लिहायला वेळच नाही हा मुख्य प्रश्न अजुन अनुत्तरीतच आहे. यासाठी दोन उपाय आहेत माझ्याकडे.
  • ब्लॉगरमध्ये settings → Email & Mobile → posting options मध्ये जाउन आपला सीक्रेट ईमेल आयडी तयार करा. खालील उदाहरणात मी salilchaudhary.ABCD@blogger.com हा सीक्रेट आयडी बनवीला आहे. यामधील ABCD हे मी दीलेले गुप्त शब्द आहेत. तुम्ही देखिल असा एक आयडी बनवा. या आयडीला पाठविलेली ईमेल आपोआप ब्लॉगरवर प्रसिद्ध होइल.

म्हणजे ब्लॉग वर लॉग-इन न करता, फक्त एका ईमेलद्वारे तुम्ही डायरी लिहु शकता.
  • याहीपुढे जाउन settings → Email & Mobile → posting options मध्ये Add mobile device येथे तुम्ही आपला मोबाईल नंबर रजीस्टर करु शकता व फक्त SMS किंवा MMS द्वारे ब्लॉग म्हणजेच तुमची ऑनलाईन डायरी लिहु शकता. ही SMS ची सुविधा सध्या फक्त US मधील नंबर्ससाठी असली तरी मी यापुर्वी सांगीतलेली SMS to email ची विकत (Paid) सेवा घेउन आपण भारतातही फक्त SMS द्वारे ब्लॉगींग किंवा डायरी लेखन करु शकतो.
मी तुम्हाला डायरी लिहिण्याचे एवढे उपाय सांगीतले आहेत की आता २०१० मध्ये डायरी न लिहिण्यासाठी तुमच्याकडे काही कारणच उरले नसावे. २०१० ची डायरी नक्की लिहा.
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


0 comments:

Post a Comment