300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Wednesday, 11 November 2009

Tagged under: , ,

Free "Marathi-English" and "English-Marathi" online dictionary by Google

मित्रहो, नेटभेटवर यापुर्वी आपण भारत सरकारच्या संचार आणि सूचना प्रॉद्योगिकी मंत्रालयातर्फे(Ministery of communication and information technology, Government of India)भारतीय भाषांसाठी तंत्रज्ञान विकास कार्यक्रमा अंतर्गत (Technology Developmentfor Indian Languages (TDIL) Programme) विकसीत करण्यात आलेल्या "मराठी - इंग्लीश" व "इंग्लीश - मराठी" शब्दकोष या सॉफ्टवेअरबद्दल माहीती घेतली होती.

आज आपण आणखी एका मोफत "मराठी - इंग्लीश" व "इंग्लीश - मराठी" शब्दकोषाबद्दल माहीती घेणार आहोत. हा शब्दकोष मात्र डाउनलोड करावा लागत नाही. ही एक मोफत ऑनलाईन सेवा आहे आणि ती पुरवलेली आहे गुगल काकांनी.

गुगलने जगातील सर्व प्रमुख भाषांची डीक्शनरी मोफत उपलब्ध करुन दीली आहे. यामध्ये मराठी, हिंदी, बंगाली, तेलुगु, गुजराती, कन्नडा, मल्याळम व तामिळ या सात प्रमुख भारतीय भाषांचा समावेष आहे.

गुगल डीक्शनरी कशी वापरावी?

  1. गुगलच्या इतर सर्व सेवांप्रमाणेच गुगल डीक्शनरी वापरावयास खुप सोपी आहे.
  2. www.google.com/dictionary ला भेट द्या.
  3. तेथे English चा पर्याय निवडा (खालील चित्रामध्ये बाण क्रमांक १)
  4. आता English < > Marathi असे लिहिलेले दीसेल. त्यावर क्लिक करा (खालील चित्रामध्ये बाण क्रमांक 2)


5. English < > Marathi समोरील रकान्यात पाहीजे तो शब्द लिहा
6. Search Dictionary हे बटण वापरुन त्या शब्दाचा अर्थ पहा.
याचप्रकारे मराठी < > ईंग्रजी डीक्शनरी देखील वापरता येते.

  1. www.google.com/dictionary ला भेट द्या.
  2. तेथे Marathi चा पर्याय निवडा (खालील चित्रामध्ये बाण क्रमांक ३)
  3. आता Marathi < > English असे लिहिलेले दीसेल. त्यावर क्लिक करा (खालील चित्रामध्ये बाण क्रमांक ४)
  4. Marathi < > English समोरील रकान्यात पाहीजे तो शब्द लिहा
  5. Search Dictionary हे बटण वापरुन त्या शब्दाचा अर्थ पहा.

गुगलची ही डीक्शनरी फेवरेट्स साइट्स मध्ये सेव्ह करा आणि पाहीजे तेव्हा जगातील या सर्वात पॉवरफुल डीक्शनरीचा उपयोग करा. गुगल डीक्शनरी कशी वाटली ते कळवायला विसरु नका.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment