गेल्या महीन्यात लिहिलेल्या "गुगल दी ग्रेट" या लेखात आपण पाहीले होते की भारतामध्ये फक्त ई-मेलचं क्षेत्र वगळता सर्च, सोशल नेटवर्कींग , ब्लॉगींग, मॅप्स, आणि मल्टीमेडीया या क्षेत्रात गुगल अग्रभागी आहे. आणि तेव्हा लवकरच गुगल ई-मेल क्षेत्रातही याहुला मागे टाकेल असे मी म्हंटले होते. आणि झालेही अगदी तसेच. या महीन्यात गुगलने भारतातील सर्वात मोठी ई-मेल सेवा बनण्याचा पराक्रम केला आणि प्रतीस्पर्धी याहुला मागे टाकले.
वीझीसेन्स (ViziSense) या ऑनलाइन सर्वेक्षण करणार्या कंपनीने नुकताच गुगलची ईमेल सेवा म्हणजे जीमेल ही भारतातील सर्वात मोठी ईमेल पुरवीणारी सेवा असल्याचे जाहीर केले. भारतातील १८ दशलक्ष इतके जीमेल युसर्स मिळवणार्या गुगलने या क्षेत्रात जुना खेळाडु असलेल्या याहु मेल सर्वीसला मागे टाकले. याहुकडे १६.८ दशलक्ष इतके इमेल युजर्स आहेत. तर रेडीफमेल ६.२५ दशलक्ष ई-मेल युजर्ससह तीसर्या क्रमांकावर आहे.
जीमेलचे युजर्स सरासरी ३ % दराने वाढत आहेत तर याहुचे युजर्स सरासरी ८ % दराने कमी होत आहेत. याच आपल्या जुन्या वापरकर्त्यांना पुन्हा आकर्षीत करण्यासाठी याहुने "It's You !" हे नविन मार्केटींग कँपेन चालु केले आहे. यामध्ये त्यांनी टीव्ही आणि वर्तमानपत्रांतील जाहीरातींचा वापर केला आहे.

याहु, रेडीफमेल आणि मायक्रोसॉफ्टचे विंडोज लाइव्ह मेल या ईमेल सेवांना आता निश्चीतच काही भक्कम पावले उचलावी लागतील अन्यथा जीमेल लवकरच या सर्वांना पुर्णपणे झाकोळुन टाकेल यात शंकाच नाही.
0 comments:
Post a Comment