पुस्तक भेट योजना जाहीर केल्यापासुन गेल्या एका महीन्यात एकुण २८७ वाचकांनी नेटभेट चे सभासदत्व स्वीकारले. आता नेटभेट परीवाराचे एकुण ४४५ सभासद झाले आहेत.
त्यापैकी दोन भाग्यवान विजेते आम्ही लॉटरी पद्धतीने निवडले आहेत.
नेटभेटच्या या दोन भाग्यवान विजेत्यांचे इमेल पत्ते आहेत -
apmayekar@gmail.com - प्रकाशवाटा
jyoti0303@ymail.com - इडली, ऑर्कीड आणि मी
नोव्हेंबर महीन्यासाठी (आणि जमल्यास पुढे प्रत्येक महीन्यात !) नेटभेटच्या सर्व सभासदांकरीता आम्ही पुन्हा एकदा पुस्तकभेट योजना राबवत आहोत.
मात्र नोव्हेंबर महीन्यासाठी या योजनेत दोन छोटेसे बदल करत आहोत.
- पुस्तकभेट योजने मध्ये कोणते पुस्तक हवे आहे हे सभासदांनी ठरवायचे आहे. बक्षीस मिळाल्यास सभासदांना कोणते पुस्तक हवे आहे हे त्यांनीच ठरवायचे आहे. त्यासाठी या लेखाच्या कमेंट्स मध्ये आपल्या इ-मेल पत्त्यासह पुस्तकाचे नाव सुचवावे.
- पुस्तक मराठी भाषेतीलच असावे.
- पुस्तक गेल्या दोन वर्षात प्रकाशीत/पुनर्प्रकाशीत झालेले असावे.
- पुस्तकाची किंमत रुपये ५०० पेक्षा अधिक नसावी. :-)
- या वेळेस दोन नव्हे तर एकुण पाच विजेते निवडण्यात येतील.
२१ नोव्हेंबर रोजी लकी ड्रॉ द्वारे विजेत्यांचे इमेल आयडी जाहीर करण्यात येतील. सर्व विजेत्यांना इमेलद्वारे कळवण्यात येइल.
फक्त आणि फक्त आमच्या मराठीप्रेमापोटी चालु केलेल्या या योजनेला आपण दीलेल्या प्रतीसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत.
मग वाचकहो, जर तुम्ही नेटभेटचे (मोफत) सभासदत्व अद्याप घेतले नसेल तर लगेचच येथे क्लिक करुन सभासदत्व घ्या किंवा खालील रकान्यात आपला ई-मेल पत्ता द्या आणि संभाव्य बक्षीसपात्र सभासदांच्या यादीत सामील व्हा.
सलिल चौधरी व प्रणव जोशी.
0 comments:
Post a Comment