एखादी माहीती पाहिजे असल्यास आपण साधारणतः काय करतो? गुगल्.कॉमवर जाउन सर्च करतो. आणि हवी ती माहीती गुगलवर हमखास मिळतेच ! 'गुगल' केले की हवी ती माहीती काही क्षणांतच समोर उपलब्ध होते.
पण एका गोष्ट लक्षात आली का तुमच्या ? सगळ्या जगाचं ज्ञान सर्वांना उपलब्ध करुन देणार्या गुगलकडे स्वतः मात्र हे ज्ञान नाहीच आहे. फक्त आपण सर्च केलेल्या शब्दांशी मिळता जुळता मायना शोधुन गुगल ते आपल्यासमोर आणुन ठेवते.
तसेच काही प्रश्न असे असतात ज्यांची बरोबर उत्तरे देणे गुगललाही जमत नाही. यांवर उपाय म्हणुनच स्टीवन वोलफ्राम (Stephen wolfram) या शास्त्रज्ञाने वोलफ्रामअल्फा.कॉम http://www.wolframalpha.com/ या वेबसाईटची निर्मीती केली आहे. वोलफ्रामची खासीयत म्हणजे हे गुगल सारखे सर्च इंजिन नाही तर संगणकीय ज्ञान म्हणजेच Computational knowledge असलेले इंजिन आहे.
वोलफ्राम अल्फा नक्की काय करते?
आपण सर्च केलेल्या शब्दांचा अर्थ लावुन वोलफ्राम त्याचे एका तर्कसुसंगत प्रश्नात रुपांतर करते आणि मग विविध आलेख, नकाशे, चित्रे वापरुन नीटनेटक्या मांडणीत त्याचे उत्तर वाचकांसमोर ठेवते. उदाहरणार्थ जर वोलफ्रामवर मुंबई असे सर्च केले तर त्यामध्ये मुंबईची लोकसंख्या, भारताच्या नकाशावरील मुंबईचे ठीकाण, समुद्रसपाटी पासुनची उंची, लोकल स्टँडर्ड वेळ अशा गोष्टी समोर येतात.
एवढेच नव्हे तर "Difference between mumbai and delhi" असा शोध वोलफ्राम मध्ये घेतल्यास या दोनही शहरांची लोकसंख्या, नकाशावरील ठीकाण , दोघांमधील अंतर आणि ते अंतर विमानाने पार करण्यास लागणारा वेळ या सर्वांची उत्तरे मिळतात.
वोलफ्राम अल्फा मध्ये काय चांगले आहे?
वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, अभियंते यांच्यासाठी वोलफ्राम अल्फा अतीशय उपयुक्त आहे. वोलफ्रामने विविध विषयांचे ज्ञान आपल्यामध्ये सामावलेले आहे. गणित, संख्याशास्त्र, तारीख व वेळ, अर्थशास्त्र, शरीरशास्त्र, भुगोल, जीवशास्त्र, भौतीकशास्त्र, रसायनशास्त्र, रंगांचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, संगीत, खेळ अशा अनेक विषयांच्या माहीतीने वोलफ्राम अल्फा तुडुंब भरलेली आहे.
उदाहर्णार्थ - २ मिलियन असे टाइप केल्यानंतर खालीलप्रमाणे माहीती समोर येते.
असे हे ज्ञानाचे भंडार पाहण्यासाठी http://www.wolframalpha.com/ या साईटला भेट द्या.
मात्र वोलफ्राम अल्फामध्ये अजुन बर्याच सुधारणा अपेक्षीत आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वोलफ्रामचा स्पीड (गुगलने खरेतर काही क्षणात उत्तरे शोधुन देण्याची वाईट सवय लावली आहे आपल्याला !). गुगलच्या मानाने उत्तरे शोधण्याचा वोलफ्रामचा वेग थोडा कमी आहे.
अजुनही ह्युमन लँगवेज म्हणजेच मानवी भाषा नीटशी न कळल्याने “WolframAlpha isn’t sure what to do with your input” असा मेसेज बर्याच वेळा दीसतो.
नुकताच सुरु झालेल्या या वेबसाईटला अजुन बरीच प्रगती करायची आहे. पण कृत्रीम बुद्धीमत्ता बनवण्याच्या मानवाच्या प्रयत्नांची नांदी झाली आहे हे खरे!
0 comments:
Post a Comment