[ MARATHI ].......इंटरनेटवर टाइमपास करणार्याचं फेव्हरेट ठीकाण म्हणजे युट्युब्.कॉम. युट्युबवर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हीडीओज आहेत की पाहण्यासाठी वेळ अपुरा पडेल पण मन भरणार नाही. मात्र दुर्दैवाने सर्वांनाच इतका वेळ असतो असे नाही. अशा माझ्या सर्व बिझी मित्रांसाठी मी युट्युबवरील एक खास व्हीडीओ शोधुन काढलाय.
१२ सप्टेंबरला म्हणजे फक्त १२ दिवसांपुर्वी अपलोड केलेला हा केवळ चार मिनिटांचा व्हीडीओ जगभरात आतापर्यंत 416,174 वेळा पाहण्यात आला आहे. या व्हीडीओमध्ये युट्युबवर आतापर्यंत सर्वाधीक पाहील्या गेलेल्या १०० व्हीडीओजची क्षणचित्रे आहेत.
टीव्हीवर (बहुदा) AXN या चॅनेलवर "Most funniest videos" असा एक कार्यक्रम दाखवला जातो. युट्युबवरील हा व्हीडीओ पाहताना त्या कार्यक्रमाची आठवण होते.
कोलांटी उडी मारुन पँट घालणारा बहाद्दर, अगदी जमीनीलगत माणसांच्या गर्दीमध्ये विमानाचे लँडींग आणि मोठ्या रबरी फुग्यावर उडी मारुन परत सरळ उभा राहणारा कसरतपटू हे या व्हीडीओमधील माझे आवडते क्षण आहेत.
आणखी एक, स्पीकर्स चालु ठेवायला विसरु नका. हा व्हीडीओ चालु असताना वाजणारं गाणं पण छान आहे.
नेटभेटच्या सर्व वाचकांसाठी हा कॉमेडी व्हीडीओ येथे देत आहे. त्याचा आस्वाद नक्की घ्या. आणि तुमचे आवडते क्षण कोणते आहेत ते सांगायला विसरु नका.
0 comments:
Post a Comment