300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Tuesday, 18 August 2009

Tagged under:

How to extract images from power point slide shows?

[ MARATHI ].......


आपल्याला इमेल द्वारे अनेक छान छान पॉवर पॉइंट स्लाइड्स शोज पाठवले जातात. एखादी उपदेशक माहीती, सुविचार आणि अनेक मनमोहक चित्रे असे या स्लाइड्स शोज् चे स्वरुप असते. प्रामुख्याने अशा स्लाइड्स मधील चित्रे खुप सुंदर असतात. बघता क्षणीच मन मोहुन घेणारी चित्रे लगेचच डाउनलोड करुन वॉलपेपर म्हणुन ठेवावीशी वाटतात. (माझ्या लॅपटॉपवर असलेले वॉलपेपर्स हे हमखास एखाद्या स्लाइड शो मधुन घेतेलेले असतात.)

आजच्या लेखामध्ये मी पॉवर पॉइंटमधुन सर्व चित्रे (images) त्यांच्या मुळ आकारामध्ये (Original resolution) एकत्र संगणकावर कशी कॉपी करता येतील ते सांगणार आहे.

सर्वसाधारणपणे ईमेजवर राइट क्लिक करुन Save as वर क्लिक केल्यास ती इमेज संगणकावर सेव्ह करता येते मात्र या पध्दतीमध्ये एक दोष आहे. या पद्धतीमध्ये इमेजची मुळ प्रत कॉपी न होता पॉवर पॉईंटमध्ये काँप्रेस्ड (लहान केलेली) प्रत सेव्ह होते.

यासाठी एक सोपी युक्ती आहे -

  • संगणकावरील पॉवर पॉइंट (.ppt) फाइल ओपन करा. (जर फाइल .pps या प्रकारची असेल तर त्यावर राइट क्लिक करुन फाइलचे एक्स्टेंशन .ppt असे बदलुन घ्या Right click → rename).

  • आता File → save as वर क्लिक करा.

  • खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे save as type मध्ये web page (*.htm, *.html) हा पर्याय सीलेक्ट करा. आणि Save बटणावर क्लिक करा.


आता संगणकावर जेथे (ज्या फोल्डरमध्ये) ही ppt फाइल सेव्ह केलेली होती त्याच ठीकाणी त्याच नावाने एक फोल्डर आणि एक htm/html फाइल सेव्ह होइल. या फोल्डरमध्ये सर्व चित्रे (images) प्रत्येकी दोन वेळा सेव्ह झालेली आढळतील. एक चित्र मुळ प्रतीचे (Original resolution) आणि दुसरे चित्र कंप्रेस्ड म्हणजेच लहान आकाराचे असेल.

याच प्रकारे (ppt) पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मधील ऑडीओ किंवा व्हीडीओ फाइल्स देखील संगणकावर सेव्ह करता येतील.

ही छोटीशी टीप कशी वाटली ते सांगायला विसरु नका. वाचकांच्या कमेंटस मुळेच मला अधिकाधिक लिहायला स्फुर्ती मिळते.















Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment