सुस्वागतम !
मित्रहो, केवळ मराठी ब्लॉग्जमध्येच नव्हे तर ब्लॉगर्सच्या दुनियेतील पहील्याबहील्या फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे.
हा फोरम म्हणजे एक गप्पांचा कट्टा आहे ज्यावर आपण मुक्तपणे गप्पा मारु शकतो, विचार मांडु शकतो आणि मिळुन सर्वांचे प्रश्न सोडवु शकतो.
इथे आपले प्रश्न आणि विचार इंग्रजीत आणि मराठी भाषेतही मांडण्याची सोय आहे. त्यासाठी फोरमच्या खाली एक "मराठी लिखाणासाठीचा बोर्ड" देखील आहे. या बोर्डवर मराठीतच नव्हे तर इतर अनेक भारतीय भाषांमध्ये लिहिता येते. येथे मजकुर लिहुन तो फोरम वरील विषयांमध्ये चिकटवता (Copy-Paste) येइल.
आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांचा नेटभेट कट्टा तुम्हाला नक्की आवडेल ही अपेक्षा.
नेटभेट फोरमला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा. किंवा नेटभेटच्या मुख्यपानावर नेव्हीगेशन बार मध्ये Forum वर क्लिक करा.
मी तुमच्या प्रतीसादाची, प्रश्नांची वाट बघत आहे आणि तुमच्याशी गप्पा मारायला उत्सुक आहे.
सलिल चौधरी
0 comments:
Post a Comment