नुकताच जीमेलने (Gmail) एका नविन सुविधेची घोषणा केली. आता इमेलद्वारे २५ एमबी इतक्या आकाराच्या फाइल्स अॅटेच (जोडता) करता येतील. यापुर्वीची असलेली २० एमबीची क्षमता वाढवुन २५ एमबी केल्यामुळे आता अधीकाधीक मोठ्या फाइल्स इमेलद्वारे पाठविण्याची सोय झाली आहे. मात्र या लेखाचा मुख्य विषय अॅटेचमेंटच्या वाढलेल्या क्षमतेविषयी नसुन गुगल काकांच्या एका चलाख चालीचा आहे. काय आहे ही चाल ?
गुगलने वाढवीलेल्या क्षमतेमागे एक मेख लपलेली आहे. ही वढीव क्षमता फक्त जीमेल ते जीमेल संवादासाठीच आहे. म्हणजेच तुम्ही याहु किंवा हॉटमेल सारख्या कमी अॅटेचमेंट क्षमता असलेल्या इमेल सर्वीसेससाठी या सुवीधेचा फायदा नाही घेउ शकत. जास्तीत जास्त लोकांना जीमेल कडे आकर्षीत करण्यासाठीच जीमेलने हे पाउल उचललेले आहे.
सर्च इंजीन आणि ऑनलाइन अॅड्स मध्ये गुगल आघाडीवर आहेच पण इ-मेल सर्वीसच्या बाबतीत मात्र याहुच सगळ्यात पुढे आहे. इथेही बाजी मारण्यासाठी गुगलचे हे प्रयत्न चालु आहेत्त.
म्हणुन तर मी गुगल काकांचा फॅन आहे, मला खात्री आहे की लवकरच गुगल काका या क्षेत्रातही अजिंक्य होतील.
0 comments:
Post a Comment