300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Sunday, 5 July 2009

Tagged under:

Access Yahoo Messenger Online ! Njoy !

[ MARATHI ].......
यापुर्वीच्या एका लेखामध्ये आपण मीबो.कॉम या वेबसाइटबद्दल बोललो होतो. सर्व इंस्टंट मेसेजींग सर्वीसेस एकाच वेळी एकाच ठीकाणी आणि ते देखील कोणत्याही सॉफ्टवेअर डाउनलोडशिवाय ! पण खुप कमी लोक या चांगल्या साइटचा वापर करतात. कारण एकच, कोणाला बदल नको आहे. जीटॉक किंवा याहू मेसेंजरचा इंटरफेस (चेहरामोहरा) इतका परीचयाचा आणि सवयीचा झाला आहे की दुसरीकडे कुठेच चॅटींग करायला मजा येत नाही.

मात्र बर्‍याचदा ऑफीसेस मध्ये याहु मेसेंजर किंवा जीटॉक सारखे सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करता येत नाहीत अशा वेळेस ऑनलाइन चॅटींग साठी याहु आणि गुगल या दोघांनीही सुविधा पुरवीली आहे.

गुगलची जीटॉक ही सेवा जीमेल (Gmail) किंवा आय्-गुगल (igoogle) द्वारे वापरता येते. याहुनेही त्यांच्या नविन याहु मेल सेवेमध्येच चॅटींगचा पर्याय उपलब्ध करुन दीला आहे. पण वर उल्लेखीलेल्या प्रमाणे जोपर्यंत आपल्या आवडीचा स्टँडर्ड इंटरफेस दीसत नाही तोपर्यंत मन मानत नाही ना:-) म्हणुनच आज मी आपल्याला ऑनलाइन याहु मेसेंजर बद्दल सांगणार आहे.

ऑनलाइन याहु मेसेंजर हुबेहुब डाउनलोड केलेल्या याहु मेसेंजर क्लाएंट सारखाच दीसतो. फक्त ऑनलाइन असल्यामुळे काही फीचर्स कमी केलेले असतात.

  • http://www.yahoo.com/ वर जा. तिथे उजव्या बाजुला मेसेंजरचे बटण दीसेल. त्यावर क्लिक करा


  • याहु मेसेंजर चे पान उघडेल, त्यावर पहीला डाउनलोडचा पर्याय दीसेल. त्याच पानावर खाली WEB चा पर्यायही दीलेला आहे. तेथे More info या लिंकवर क्लिक करा.

  • चित्रात दाखविल्याप्रमाणे Get Started बटणावर क्लिक करा.


  • आता तुमच्या ओळखीचा याहु मेसेंजर (Yahoo messenger) चालु होइल त्यावर लॉग्-इन करा आणि सुरु करा चॅटींग.
टीप -
याहु मेसेंजर ऑनलाइन वापरण्यासाठी अ‍ॅडोब अ‍ॅक्रोबॅट फ्लॅश प्लयेरची आवश्यकता असते. साधारणपणे सर्वच संगणकांवर अ‍ॅडोब अ‍ॅक्रोबॅट फ्लॅश प्लयेर उपल्ब्ध असतेच्.पण जर नसेल तर येथे क्लिक करुन मोफत डाउनलोड करता येइल.
तुमच्या संगणकामध्ये अ‍ॅडोब अ‍ॅक्रोबॅट फ्लॅश प्लयेर आहे किंवा नाही ते जाणुन घेण्यासाठी फक्त येथे क्लिक करा. उत्तर आपोआप मिळेल.

0 comments:

Post a Comment