
ब्लॉगर्.कॉम वर बनवण्यात आलेल्या प्रत्येक ब्लॉगच्या वर ब्लॉगरचा लोगो आणि सर्चचा पर्याय असणारी एक पट्टी असते. त्या पट्टीला नेव्हीगेशन बार असे म्हणतात. हा नेव्हीगेशन बार लपविण्यासाठी काय करावे याची माहीती मी आज देणार आहे.
तसा हा नेव्हीगेशन बार त्रास देत नाही पण त्यावर पुढचा ब्लॉग पहाण्यासाठी एक लिंक असते. त्यामुळेच उगाचच आपल्या ब्लॉगच्या वाचकाला पुढच्या ब्लॉगवर जाण्याची इच्छा होते. म्हणून बर्याच जणांना हा नेव्हीगेशन बार नकोसा असतो.
नेव्हीगेशन बार लपविण्यासाठी काय करावे -
१. तुमच्या ब्लॉगर्.कॉम अकाउंट वर लॉग्-इन करा.
२. आणि खाली दाखविल्याप्रमाणे Layout वर क्लिक करा.

३. आता Edit HTML वर क्लिक करा.
४. आता तुमच्या ब्लॉगच्या टेम्प्लेटचा कोड दीसेल (घाबरु नका, सोपे आहे ते!). त्यामध्ये खाली दीलेला कोड चिकटवा (Copy and paste). कोड टेम्प्लेटमध्ये कुठेही चिकटवला तरी चालेल. पण टेम्प्लेटमध्ये
< head> , < /head>आणि या दोन चिन्हांच्या मध्ये चिकटवलेले अधीक चांगले.
navbar {height: 0px;visibility: hidden;display: none;}

आता खाली सेव्ह टेम्प्लेट (Save Template) असे बटण दीसेल त्यावर क्लिक करुन हा केलेला बदल सुरक्षीत करा.
आता तुमच्या ब्लॉगला भेट द्या आणि पहा जादु!
नेव्हीगेशन बार गायब झालेला असेल!
0 comments:
Post a Comment