इंटरनेटवर शोधणे म्हंटले की गुगल काकांचा उल्लेख करणे अपरीहार्य ठरते. मराठी वाचकांना स्व्-भाषेतील वेबसाईट्सचा शोध घेता यावा यासाठी गुगल काकांनी खास मराठमोळ्या शैलीत शोधाची (Search) सुवीधा उपलब्ध करुन दीली आहे.
तसे आधीच्या लेखामध्ये उल्लेखीलेल्या पर्यायांचा वापर करुन मराठीतील शोधशब्द गुगलच्या सर्च बॉक्स मध्ये लिहुन (Copy -Paste) सुद्धा मराठी सर्च करता येते मात्र यामध्ये बराचसा वेळ खर्ची पडतो.गुगल काकांनी यावर उपाय शोधला आहे त्याचे नाव आहे मराठी ऑन्स्क्रीन कीबोर्ड (Marathi on-screen keyboard). सध्या प्रायोगीक तत्त्वावर उपलब्ध केलेल्या या सोयीचा वापर कसा करावा याचे सवीस्तर मार्गदर्शन खालीलप्रमाणे -
१. गुगलच्या भारतीय साइटवर म्हणजेच google.co.in वर जाउन लॉग्-इन करा.
२. त्यानंतर More > even More > labs मध्ये जा


३. तेथे On-screen keyboard gadget वर क्लिक करा

४. Compose search queries in indic languages असे शिर्षक असणारी नवीन विंडो उघडेल. येथे बर्याच भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध असेल त्यापैकी तुम्हाला हवी असणारी भाषा निवडा (साहजीकच मराठी !)

५. बाजुला Add to google असे बटण दीसेल, त्यावर क्लिक करा. iGoogle असे लिहिलेली विंडो उघडेल, पुन्हा Add to google असे बटण दीसेल त्यावर क्लिक करा.

६. आता तुम्ही आपोआप तुमच्या गुगल होमपेज (घरचे पान!) वर वळवले जाल आणि तेथे मराठी on-screen keyboard दीसेल.
७. चौकोनी आकारामध्ये मराठीतील सर्व अक्षरे लिहिलेली दिसतील, माउसच्या सहाय्याने अक्षर सीलेक्ट केल्यास त्या अक्षराची पुर्ण बाराखडी देखील दीसेल. एकुणच मराठीतील सर्व अक्षरे आता तुमच्या स्क्रीनवर दीसतील आणि फक्त अक्षरा>वर क्लिक करुन पुर्ण शोध शब्द गुगलच्या शोध रकान्यात लिहिता येइल.
मराठी on screen keyboard च्या सहाय्याने मराठीतुन शोध घ्या आणि मग पहा इंटरनेटच्या महाजालावर किती मराठी ज्ञान लपलेले आहे ते !
0 comments:
Post a Comment