म्हाडाचे ऑनलाइन लॉटरी रीझल्ट्स फक्त नेटभेटच्या वाचकांसाठी !
म्हाडाने स्वप्नपुर्ती केली खरी पण बर्याच जणांना अजुनही आपला भाग्योदय झाला की नाही हेच अद्याप कळलेले नाही. याला कारण म्हणजे म्हाडाची बंद असलेली वेबसाइट. माहीतीच्या युगात या सर्वात महत्त्वाच्या माहीतीपासुन अनभीन्न राहीलेल्यांपैकी मी ही एक.
शेवटी बर्याच प्रयत्नांनी म्हाडाच्या लॉटरीचे रीझल्ट्स ऑनलाइन मिळवलेच. नेटभेटच्या वाचकांच्या सोयीसाठी ते इथे देत आहे.
हे रीझल्ट्स मी मिळवले http://www.prahaar.in/ या वेबसाइटवर. नारायण राणे यांच्या प्रहार या वर्तमानपत्राची वेबसाइट. आजच्या अंकात त्यांनी पुर्ण यादी छापली आहे.
काम झाले खरे पण एवढ्या मोठ्या यादीत नजरचुकीने नंबर बघीतला न जाण्याचा धोका होता. म्हणुन मग चित्ररुपातल्या वर्तमानपत्राचे (Scanned document) एक्सेलशीट मध्ये रुपांतर केले.
इथे क्लिक करुन एक्सेल शीट डाउनलोड करा.
या एक्सेल शीटमध्ये खालील स्वरुपात नंबर लिहिलेले आहेत -
(फ्लॅट क्रमांक + स्पेस + अप्लीकेशन क्रमांक)
उदाहरणार्थ -
14 359788
वरील क्रमांकामध्ये १४ हा फ्लॅट क्रमांक असुन ३५९७८८ हा अर्ज क्रमांक आहे.
ही एक्सेल शीट सर्चेबल आहे म्हणजेच कंम्प्युटरच तुमचा नंबर शोधुन देउ शकतो. फक्त ctrl + f दाबा आणि तुमचा नंबर लिहुन एंटर करा.
(टीप - ही माहीती फक्त वाचकांच्या सोयीसाठी असुन, कृपया केवळ या माहीतीवर अवलंबुन राहु नये.)
Best of Luck !
0 comments:
Post a Comment