मी मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा जबरद्स्त चाहता आहे. कारण माझे दिवसातुन किमान ६ तास मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरण्यात जातात. एक गोष्ट मला मनोमन पटली आहे जी मी तुम्हालाही सांगु इच्छीतो. "If you know excel, you will excel in life" म्हणजेच जर तुम्हाला एक्सेल येत असेल तर तुम्ही आयुश्यात प्रगती करु शकाल.
आता विषयांतर टाळुन आपल्या मुळ विषयाकडे वळतो. तसे एक्सेल मध्ये खुप शॉर्ट कट्स आहेत. पण मागे एकदा सांगीतल्याप्रमाणे मी बेसीक शॉर्ट कट्स इथे सांगणार नाही आहे. मात्र मी अशा काही टीप्स देणार आहे ज्या तुम्ही वापरल्यात तर तुम्हाला संगणकावर काम करताना पाहणारी मंडळी तोंडात बोटे घातल्याशिवाय राहणार नाहीत.
- मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये जेव्हा एखादे डाटा टेबल सीलेक्ट करावयाचे असेल तेव्हा पहील्या सेलला (Cell) सीलेक्ट करुन ctrl+shift दाबुन ठेवावे आणि मग दिशादर्शक बाण ( → / ↓) वापरावा.
उदाहरण - खाली दीलेले टेबल जर सीलेक्ट करायचे असेल तर - पहीला सेल सीलेक्ट (Name) करुन घ्या. आणि नंतर ctrl+shift+↓ वापरुन पुर्ण कॉलम सीलेक्ट करा (चित्र क्रमांक २) आणि त्यानंतर ctrl+shift+ → वापरुन पुर्ण टेबल सीलेक्ट करा (चित्र क्रमांक ३).



- एखाद्या कॉलम (स्तंभ) अथवा रो (ओळ) मधील शेवटचा सेल सीलेक्ट करायचा असेल तर ctrl+ दिशादर्शक बाण वापरावा.
उदाहरण - खाली दीलेल्या टेबलमध्ये जर पहील्या सेल मधुन (Name) ओळीतील शेवटच्या सेल मध्ये जायचे असेल तर (Tuesday) ctrl+ → वापरुन जाता येइल.
आणखी काही अचंबीत करणारे शॉर्ट कट्स -
- एखाद्या ओळीला (रो Row) लपवायचे (Hide) असेल तर ctrl + ( एकत्र दाबावे.
- एखाद्या स्तंभाला (कॉलम column) लपवायचे (Hide) असेल तर ctrl + ) एकत्र दाबावे.
- ctrl+: एकत्र दाबल्यास त्या दीवसाची तारीख आपोआप लिहिता येते.
- एक्सेल फाइल मध्ये बर्याच वर्कशीट (Worksheets) असतात. ctrl+page up किंवा ctrl + page down ही बटणे वापरुन तुम्ही सहजगत्या त्या फाईल मधुन फिरु शकता.
या सर्व गोष्टी मी स्वतः कंप्युटरशी खेळता खेळता शिकलो आहे. तुम्हीही खेळुन पहा, खुप काही शीकाल.
0 comments:
Post a Comment