संगणक सुरु केल्यानंतर डेस्कटॉपवरील फाइल किंवा आयकॉन सीलेक्ट करण्याकरीता -
- Shift + जी फाइल सीलेक्ट करावयाची आहे त्याचे आद्याक्षर टाइप करा. उदाहरणार्थ जर My computer सीलेक्ट करायचे असेल तर Shift + m टाईप करा. जर m वरुन सुरु होणार्या एकापेक्षा जास्त फाईल्स डेस्कटॉपवर असतील तर Shift + m दाबत राहल्यास आपण त्यापैकी हवी असलेली फाईल उघडु शकता.
- दुसरा मार्ग म्हणजे Ctrl + ↓ किंवा Ctrl + ↑ एकदा दाबा आणि त्यानंतर ↓ किंवा ↑ या बटणांच्या सहाय्याने आपणास हवी असलेली फाइल सीलेक्ट करता येते.
- आणखीन एक मार्ग म्हणजे page up/page down ही बटणे वापरुन डेस्कटॉप वरील फाईल सीलेक्ट करता येते.
- चौथा आणि मला माहीत असलेला शेवटचा मार्ग म्हणजे Ctrl + Tab (या लेखाच्या शेवटी सविस्तर माहीती दीली आहे.)
संगणकावरील Start मेनु सुरु करण्याकरीता विंडोज की अथवा Cntl + Esc चा वापर करा.
(Windows key (विंडोज की) म्हणजे की बोर्डच्या डाव्या बाजुला ctrl (Control) आणि Alt या बटणांच्या मध्ये असलेले आणि मायक्रोसॉफ्टचा लोगो असलेले बटण.)
एखादी फाईल किंवा फोल्डर शोधावयाचे असल्यास F3 ही फंक्शन की वापरावी.
जर एखाद्या फाईल किंवा फोल्डरचे नाव बदलायचे असेल तर (Rename) तर ती फाईल सीलेक्ट करुन मग F2 ही फंक्शन की वापरावी.
डेस्कटॉप वर खालच्या बाजुला एका पट्टीवर काही लहान आयकॉन दिसतात. या पट्टीस क्विक लाँच बार असे म्हणतात. क्विक लाँच बार वरील आयकॉन्स सीलेक्ट करण्यासाठी Ctrl + Tab वापरावे.
--> Ctrl + Tab एकदा दाबल्यास - Start मेनु सीलेक्ट होतो
--> Ctrl + Tab दुसर्यांदा दाबल्यास - क्विक लाँच बारवरील पहीला आयकॉन सीलेक्ट होतो. पुढे दिशादर्शक बाण वापरुन सर्व आयकॉन्सना सीलेक्ट करता येते.
--> Ctrl + Tab आणखीन एकदा दाबल्यास डेस्कटॉप वरील एखादी फाईल सीलेक्ट करता येते. पुढे दिशादर्शक बाण वापरुन सर्व आयकॉन्सना सीलेक्ट करता येते.
या मालीकेतील पुढच्या लेखामध्ये सर्वात महत्त्वाचे अतीशय उपयोगी असे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये वापरले जाणारे शॉर्ट कट्स सांगेन. तोपर्यंत आता दीलेले शॉर्टकट्स वापरण्याचा सराव करा. आणि बघा की लवकरच तुम्हाला संगणकावर काम करताना पाहुन लोक कसे अचंबीत होतात ते!
0 comments:
Post a Comment