300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Monday, 25 May 2009

Tagged under: ,

Google employees Goats !




गुगलला जगातील सर्वात क्रीएटीव्ह (सॄजनशील) कंपनी समजले जाते. दररोज करोडो लोकांना गुगलच्या क्रीएटीव्हीटीचा प्रत्यय येतो. फक्त आपल्या वेब साइट्स आणि सॉफ्टवेअर्स पुरता ही क्रीएटीव्हीटी मर्यादीत न ठेवता गुगलने जीवनाच्या प्रत्येक अंगात याचा समावेश केला आहे. असाच एक नवीन प्रयोग गुगलच्या माउंटन व्ह्यु ( Mountain View headquarters) येथील मुख्यलयात करण्यात आला.

गुगल ऑफीसच्या बाहेरील माळरानावर वाळलेले गवत आहे. आगीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी ते वेळोवेळी कापावे लागते. यासाठी नेहमी वापरल्या जाणार्‍या गवत कापणार्‍या यंत्रामुळे ध्वनी आणी वातावरण प्रदुषीत होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी गुगलने चक्क २०० शेळ्या मागवल्या. एक आठवड्यासाठी या शेळ्यांनी गुगलकडे हंगामी स्वरुपावर नोकरी केली.

गुगलला या कामात खर्च जवळपास तीतकाच झाला. पण प्रदुषण झाले नाही आणि जमीनीला शेळ्यांनी खत दीले ते वेगळेच!

आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गवत कापणार्‍या यंत्रापेक्षा २०० शेळ्यांना एकत्र पाहण्यात गुगलच्या स्टाफला जो आनंद मिळाला तो काही औरच !

Source - Official Google blog

0 comments:

Post a Comment