300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Tuesday, 5 May 2009

Tagged under:

Free Domain names for blogeers !

मराठीत खुप चांगले ब्लॉग लिहिले जात आहेत. ब्लॉग आता खाजगी पुरता मर्यादीत राहीलेला नसुन तो जास्तीत जास्त जणांनी वाचावा अशीच ब्लॉगधारकाची इच्छा असते. आपला ब्लॉग ही आपली इंटरनेटवरची ओळख बनावी म्हणुन बरेच जण प्रयत्नशील असतात.

तसे blogger.com आणि wordpress.com सारख्या साईट्स या दॄष्टीने बर्‍याच सुवीधा पुरवीतात. पण ब्लॉगच्या मुख्य ओळखीमध्ये म्हणजे नावातच आपला वाटा देखील सांगतात. आता www.myname.blogspot.com अथवा www.myname.wordpress.com पेक्षा www.myname.com असे नाव सांगणे कोणालाही आवडेल. ते वाचकांना लक्षात ठेवणे देखील सोपे जाते.

परंतु आपण सगळेच जाणतो की .com हे एक्स्टेंशन मोफत मिळत नाही तर ते वीकत घ्यावे लागते.

माझ्या ज्या मित्रांना पैसे देउन साईटचे नाव विकत घेण्याची इच्छा नाही आहे त्यांच्या साठी मी हे दोन सर्वोत्तम उपाय सुचवीत आहे. मला आशा आहे की सर्व ब्लॉगर्सना ते नक्कीच आवडतील.

१. http://www.co.cc/ -

CO.CC:Free Domain

ही साईट एक अफलातुन साईट असुन .co.cc असे एक्स्टेंशन असलेले साईटचे नाव (Domain Name) चक्क मोफत देते. म्हणजे इथे एकदा रजिस्ट्रेशन केलेत की तुम्ही तुमच्या ब्लॉगला एक स्वतंत्र नाव देउ शकता. उदाहरणार्थ - http://www.netbhet.blogspot.com/ चे www.netbhet.co.cc किंवा www.netbhet.cc.cc असे नामकरण करता येइल आणि ते देखील पुर्णपणे चकटफू!




ही देखील के मोफत डोमेन नेम पुरवीणारी वेब साईट आहे. अगदी साधे आणि सोपे .tk असे एक्स्टेंशन ही वेबसाईट पुरवीते. इथे एकदा रजिस्ट्रेशन केले की ९० दिवसांपर्यंत आपण घेतलेले डोमेन नेम काही वेळा वापरणे महत्त्वाचे असते ( बहुदा ७५ वेळा) नाहीतर आपल्या साईटचे नाव काढुन घेतले जाते.

उदाहरणार्थ - http://www.netbhet.blogspot.com/ चे www.netbhet.tk असे नामकरण करता येइल आणि ते देखील मोफत!

एवढेच नव्हे तर ही वेब साईट आपला इमेल आयडीचे देखील नामकरण करुन देते. म्हणजेच myname123@rediffmail.com अशा इमेल आयडीला myname@mysurname.tk असे नाव देता येइल.

मग ब्लॉगर्स व्हा पुढे आणि आताच आपले आवडते नाव सुरक्षीत करुन घ्या नाहीतर पुन्हा .com एक्स्टेंशन सारखा मनाजोगत्या नावांचा दुष्काळ इथेही चालु होइल.

0 comments:

Post a Comment