300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Wednesday, 6 May 2009

Tagged under:

Create your own domain name for wordpress blog

वर्डप्रेस्.कॉम (wordpress.com) वरच्या ब्लॉगला स्वतःच्या साईटचे नाव देण्यासाठी काय करावे याचे सविस्तर मार्गदर्शन -

१. वर्डप्रेस्.कॉम वर जाउन साइन्-इन करा.


२. स्क्रीनच्या डाव्या बाजुला तुमच्या ब्लॉगचे नाव असलेली लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.


३. चित्रात दाखवील्याप्रमाणे "upgrades" आणि त्यानंतर "Domains" या लिंकवर क्लिक करा.


४. आता तुम्हाला तुमच्या ब्लॉगला जे स्वतंत्र नाव द्यायचे आहे ते दीलेल्या रकान्यात लिहा. माझ्या अंदाजाने वर्डप्रेस्.कॉम वर .com, .org आणि .net हे तीन एक्स्टेंशन स्वीकारले जातात. तुम्ही निवडलेले नाव उपलब्ध आहे का ते तपासुन घ्या.
५. आपल्याला हवे असलेले नाव टाइप करुन झाल्यावर "Add domain to blog" हे बटण दाबा.

६. तुम्ही निवडलेले नाव उपलब्ध असल्यास खाली दाखविल्याप्रमाणे स्क्रीन दीसेल. "Buy 15 credits" या बटणावर क्लिक करा.

७. आता Domain name विकत घेण्याची वेळ आली आहे. खाली दाखवील्याप्रमाणे तुम्हाला "Paypal" मध्ये लॉग्-इन करण्यास सांगण्यात येइल किंवा तुम्ही जर क्रेडीट कार्डने पैसे भरणार असाल तर तो पर्यायही बाजुलाच उपलब्ध आहे.

८. क्रेडीट कार्डची पुर्ण माहीती भरल्यानंतर तुमचा इमेल आयडी विचारण्यात येइल.
९. पैसे मिळाल्याची पावती या ईमेल आयडी वर पाठवण्यात येइल. पावती मिळाल्यानंतर पुन्हा वर्डप्रेस्.कॉम वर जाउन साइन्-इन करा.
१०. स्क्रीनच्या डाव्या बाजुला तुमच्या ब्लॉगचे नाव असलेली लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
११. "upgrades" आणि त्यानंतर "Domains" या लिंकवर क्लिक करा.
१२. आता तुम्ही जे नाव विकत घेतले आहे ते दीलेल्या रकान्यात लिहा.
१३. "Add domain to blog" हे बटण दाबा.(क्लिक करा)
१४. खाली दाखवील्यप्रमाणे एक फॉर्म दीसेल. त्यात सर्व आवश्यक ती माहीती भरुन द्या. ( तुम्ही दीलेली माहीती तसेच पासवर्ड तुम्हास पुन्हा मीळेल अशा ठीकाणी सुरक्षीत ठेवा, सेव्ह करा)


१५. आता तुम्हाला तुमच्या डोमेन रजीस्ट्रारच्या साइटवर नेले जाइल. सहसा तेथे काही बदल करावयाची आवश्यकता नसते. परंतु तरीही तुमची साईट अनलॉक (unlock) आहे का ते पहा. नसल्यास दीलेला पर्याय निवडुन अनलॉक (unlock) करा.



CO.CC:Free Domain
१६. आता पुन्हा एकदा "upgrades" आणि त्यानंतर "Domains" या लिंकवर क्लिक करा.

१७. तेथे (Put your blog here) असे लीहीलेले दीसेल, त्यावर क्लिक करा.

झाले आता तुमचा ब्लॉग स्वतःचे नाव धारण करुन तयार झालेला असेल. वाचकांनी जुना म्हणजे www.myname.wordpress.com असा पत्ता जरी टाइप केला तरी त्यांना नवीन पत्त्यावर म्हणजेच www.myname.com वर वळवण्यात येइल.

ही पद्धती थोडीशी किचकट आहे खरी, परंतु आपले स्वतःचे वेब नाव पाहताना होणारा आनंद कीतीतरी पटीने मोठा असतो. काही मदत भासल्यास "नेट्भेट"ला आवाज देण्यास विसरु नका.

आणि हो तुमच्या वेबसाईटचे नाव comments मध्ये जरुर लिहा. मला तुमच्या साईट्सना भेट देणे खुप आवडेल.

0 comments:

Post a Comment