300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Sunday, 3 May 2009

Tagged under: , ,

वोडाफोनच्या नवीन जाहीराती - "पांढरे शुभ्र झूझूज"

आयपीएल सामन्यांच्या दरम्यान दाखवण्यात येणार्‍या वोडाफोन मोबाईल कंपनीच्या जाहीराती प्रचंड लोकप्रीय झाल्या आहेत. या जाहीरातींमध्ये दाखवण्यात आलेल्या कार्टुन्सचे नाव आहे "झूझू" . पांढरे शुभ्र, मोठ्या डोक्याचे झूझूज म्हणजे जणु परग्रहावरचे प्राणीच वाटतात. सुरुवातीचे काही दिवस मी या जाहीरातींना अ‍ॅनीमेटेड (Animated - संगणकाच्या सहाय्याने बनवण्यात आलेले कार्टुन्स) समजत होतो.
पण मित्रहो खरे म्हणजे हे कार्टुन्स जिवंत माणसे आहेत.


वोडाफोन कंपनीच्या जाहीरातींचा तसा मी अधीपासुनच फॅन आहे. आठवा ती "you and me in this beautiful world" या गाण्याची एका लहानग्या कुत्र्याची जाहीरात. अप्रतीम. पण झूझूजने काही वेगळीच जादु केलीय.

वोडाफोनच्या O&M या जाहीरात एजन्सीने बनवीलेल्या या अ‍ॅड्सना तुफान प्रतीसाद मिळतोय. राजीव राव हे O&M चे क्रीएटीव्ह डायरेक्टअर आहेत. त्यांनी मुद्दामहुन खर्‍याखुर्‍या माणसांना कार्टुन्स बनवुन एक नवीनच प्रयोग केला.

शरीरयष्टीने लहान असणार्‍या काही मुलींवर पांढरा वेश आणि थोडेसे मोठ्या आकाराचे डोके चढवुन झूझू हे पात्र बनवण्यात आले आहे. या लहानग्या पोरींनी त्यांना अक्षरक्षः जीवंत केले आहे. या मोठ्या डोक्याच्या पात्रांच्या चेहर्‍यावरील भाव दाखवण्याकरीता रबराचे विविध आकाराचे तुकडे त्यावर चिकटवण्यात आले आहेत.

नेहमीच्या सेकंदाला २० फ्रेम्स या वेगापेक्षा थोड्या अधीक म्हणजे २५ फ्रेम्स प्रती सेकंद या वेगाने जाहीरातीचे चित्रीकरण करण्यात आले आहे, त्यामुळे या पात्रांच्या हालचाली काहीशा गमतीशीर आणि कार्टुन्स सारख्या वाटतात.

झूझूंना अगदी वेगळ्याच जगातले दाखवीण्यात आले आहे त्यामुळे त्यांची भाषा आणि आवाज मानवी आवाजांपेक्षा वेगळे दाखवीले आहेत. अगदी असंबंध उच्चारंचा वापर करुन आणि थोड्या वेगाने व चढ्या आवाजात बोलुन या झूझूंची भाषा तयार करण्यात आली आहे.

झूझूंच्या अशा २९ जाहीराती तयार करण्यात आल्या असुन आयपीएल सामन्यांच्या दरम्यान दररोज एक नवी जाहीरात दाखवीण्यात येणार आहे.


मग, तुम्हाला झूझूंची कोणती जाहीरात आवडली?



झूझूंच्या सर्व जाहीराती एकत्र पहा -




झूझूंचे वॉलपेपर्स येथुन डाउनलोड करा.


झूझूंचा स्क्रीनसेव्हर येथुन डाउनलोड करा.

0 comments:

Post a Comment