300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Thursday, 7 May 2009

Tagged under:

Backup Your Gmail account with "Gmail Backup"

Gmail पुरवीत असलेल्या उत्तमोत्तम सुविधांमुळे आपण सारेच Gmail चा भरपुर वापर करतो. आणि त्यामुळेच आज आपल्या बर्‍याच महत्त्वाच्या दस्तऐवजांसाठी Gmail हे एकमेव ठिकाण बनले आहे. खरेतर बरेच वर्षे Gmail वापरल्यामुळे आपल्या नकळत सगळ्या महत्त्वाच्या नोंदी आणि माहीती Gmail अकाउंटवर जमा होत गेलेल्या असतात. मग फक्त Gmail वर अवलंबुन न रहाता, अशा सर्व महत्त्वाच्या गोष्टींना सुरक्षीत करुन ठेवणे तीतकेच महत्त्वाचे नाही का?


तुम्ही म्हणाल, की काय गरज. Google काकांचे पॉवरफुल सर्वर्स कधीच धोका देणार नाहीत. पण मित्रांनो हातात उपाय उपल्ब्ध असताना उगाच रीस्क का घ्यायची? आज मी तुम्हाला एका अशा सॉफ्टवेअरची ओळख करुन देणार आहे जे Gmail चा बॅक-अप घेउन देते म्हणजेच तुमच्या सर्व आवश्यक ई-मेल्स तुमच्या कंप्युटरवर सुरक्षीत करुन ठेवता येतील. त्याचे नाव आहे Gmail Backup. Gmail Backup हे एक मोफत सॉफ्टवेअर आहे.आणि ते तुम्ही ईथे क्लिक करुन डाउनलोड करु शकता.


Gmail Backup डाउनलोड करुन इन्स्टॉल करा. ते चालु केल्यानंतर खाली दाखवील्याप्रमाणे दिसेल.




Gmail Backup वापरण्याची पद्धत -


१. दीलेल्या रकान्यात तुमचा पुर्ण इ-मेल आयडी (xyz@gmail.com)आणि पासवर्ड लिहा. (चिंता करु नका, तुमचा पासवर्ड सुरक्षीत असेल)


२. तुमच्या संगणकावर नेमक्या कोणत्या फोल्डरमध्ये इ-मेल साठवायच्या आहेत तो निवडा.


३. कोणत्या तारखेपासुन ते कोणत्या तारखेपर्यंतच्या इ-मेल्सचा बॅक-अप घ्यायचा आहे ते निवडा.


४. "Back up" असे लिहिलेल्या बटणावर क्लिक करा.




आता तुमच्या इ-मेल्स दीलेल्या फोल्डर मध्ये डाउनलोड होण्यास सुरुवात होइल. एकदा डाउनलोड झाल्यानंतर त्या खालील स्वरुपात फोल्डरमध्ये दीसु लागतील.

2007_08_20070804-071922-mail-noreply@google_com-Gmail_is_different_Here_s_what_you_need_to_know_-1

संगणकावर आधीच उपलब्ध असलेल्या इतर इ-मेल अप्लिकेशन्सचा (Outlook express/ microsoft outlook/ thunderbird) वापर करुन या इ-मेल्स वाचता येतील.Gmail backup द्वारा डाउनलोड केलेल्या इ-मेल्स मध्ये फाइल अटॅचमेंट्स देखील डाउनलोड होतात.


म्हणजेच आता तुम्ही सर्व महत्त्वाच्या इ-मेल्स डाउनलोड करुन सुरक्षीत ठेवु शकता. आणखी एक फायदा म्हणजे इंटरनेट कनेक्क्षन उपलब्ध नसतानाही या इ-मेल्स वाचता येतील.


किंवा समजा अगदी थोड्यावेळापुरते इंटरनेट कनेक्क्षन उपलब्ध असेल तर सर्व इ-मेल्स डाउनलोड करुन मग वेळ मिळेल तेव्हा वाचता येतील.


(टीप - Gmail backup वापरण्याआधी Gmail मध्ये असणारी IMAP ची सुवीधा सुरु करुन घ्यावी लागते. ती खाली दिल्याप्रमाणे करता येइल -

Gmail --> Settings --> Gmail Labs --> Enable IMAP)

आता राहीला प्रश्न सुरक्षीततेचा. म्हणजे Gmail मध्ये ज्या मेल्स सुरक्षीत होत्या त्या आता कंप्युटरमध्ये सुरक्षीत कशा ठेवाव्यात. त्याचा उपाय मी लीहीलेल्या या पोस्टमध्ये आहे (इथे क्लिक करा).


मग आता Gmail backup घ्या आणि निश्चींत व्हा.

0 comments:

Post a Comment