300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Friday 17 July 2015

Tagged under: , , , ,

HABITBULL - चांगल्या सवयी अंगी बानविण्याचा सोपा आणि खात्रीशीर उपाय !


चांगल्या सवयी अंगी बानविणे आणि वाईट सवयी सोडविणे हे अतिशय कठीण काम आहे. कोणतीही नवीन सवय आत्मसात करण्यासाठी बराच वेळ जावा लागतो आणि मुख्य म्हणजे त्यासाठी आवश्यक अशी स्वत:शी वचनबद्धता हवी. असे म्हंटले जाते की " What gets measured, gets improved" म्हणजेच जे मोजता येते किंवा मोजले जाते, त्यात सुधारणा करणे शक्य असते. सवयींच्या बाबतीतही असेच आहे. एखादी नवीन सवय जोडताना किंवा वाईट सवय सोडवताना जर ती मोजली गेली तर आपले उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता अधिक असते.

मित्रहो, आज आपण एका अशा मोबाईल अप्लिकेशन बद्दल माहिती घेणार आहोत जे याकामी आपली खूप मदत करणार आहे. याकामी म्हणजे नव्या सवयी जोडणे आणि जुन्या वाईट सवयी मोडणे यासाठी हे अप्लिकेशन खूप उपयोगी आहे. या अप्लिकेशनचे नाव आहे Habitbull. Habitbull  हे एक अँड्रॉईड अप्लिकेशन आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी Habitbull वापरून यशस्वीरीत्या अनेक चांगल्या सवयी लावून घेतल्या आहेत.


Seinfeld’s Productivity Secret या तत्वावर आधारीत असलेले हे अप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरमधून मोफत डाउनलोड करता येते. मग आजच हे अप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि आपल्यातील सुधारणांची सुरुवात करा.

Habitbull कसे वापरावे ?

१. आपल्या अँड्रॉईड फोनमध्ये "गुगल प्ले स्टोअर" मध्ये जाऊन Habitbull हे अप्लिकेशन शोधा व डाउनलोड करा. (अथवा येथे क्लिक करा)
२. मोबाईल फोन मध्ये अप्लिकेशन इनस्टॉल केल्यानंतर त्यामध्ये आपले फेसबुक अकाऊन्ट वापरून किंवा ईमेल वापरून रजिस्टर करा.



३. येथे मी ईमेल वापरून रजिस्टर करत आहे.



४. खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे एक अधिक चे चिन्ह दिसेल. नवीन सवय (Habit) जी आपल्याला track करायची आहे ती नोंदावण्याकरीता या अधिक चिन्हाचा वापर करा. Habitbull मध्ये आपण एकूण 100 सवयी नोंदवू शकतो.


 ५. येथे विविध सवयींचे प्रकारानुसार वर्गीकरण दिसेल. त्यापैकी आपल्याला हवा तो प्रकार निवडा.


६. आपण जी सवय निवडलेली आहे ती track करण्याचे दोन मुख्य प्रकार येथे दिसतील.

पहिला प्रकार आहे Yes / No चा . आज मी हे केले (YES) किंवा केले नाही (No) फक्त एवढेच आपल्याला track करायचे असेल तर हा पर्याय निवडावा. उदाहरणार्थ जर "सिगारेट ओढणार नाही " अशी सवय आपण नोंदविली असेल तर ज्या दिवशी सिगारेट ओढली नाही त्या दिवशी YES आणि ज्यां दिवशी सिगारेट ओढली त्या दिवशी NO असा पर्याय निवडता येईल.

दुसरा प्रकार आहे नंबरचा. उदाहरणार्थ रोज 5 सिगारेट ओढणारी व्यक्ती प्रत्येक दिवशी किती सिगारेट ओढते याचा track ठेवू शकते. आज मी २ सिगारेट ओढल्या किंवा आज मी शून्य सिगारेट्स ओढल्या अशाप्रकारे.

आपल्याला उचित वाटेल तो प्रकार निवडावा.


७. आता या सवयीला एक नाव दया आणि अधिक माहिती म्हणजेच Description (आवश्यक असल्यास) लिहा. तसेच प्रत्येक सावयीकरता एक रंग निवडता येतो, तसा तो निवडा.


८. आपण नोंदवलेली सवय आपल्याला किती दिवसांच्या अंतराने track करायची आहे ते निवडा. आणि साधारण कधीपर्यंत आपल्याला ही सवय निवडायची आहे ते habitbull अप्लीकेशनला सांगा. साधारण ६६ दिवस कोणतीही गोष्ट दररोज केल्यानंतर तिचे सवयीत रुपांतर होते.


९. आता आपण निवडलेली सवय track करायला सुरुवात करू शकता. प्रत्येक सवयीसाठी एक कॅलेंडर देण्यात आले आहे. दररोज आपण यामध्ये आपल्या सवयी बद्दलची प्रगती नोंदवू शकता. त्यासाठी फक्त कॅलेंडरमधील त्या त्या दिवसावर जाऊन दररोज टिचकी मारायची आहे.



१०. प्रत्येक दिवसागणिक जेव्हा जेव्हा आपण सवय यशस्वीरीत्या पूर्ण करतो तसे एक साखळी या कॅलेंडर मध्ये तयार होत जाते. यशस्वी दिवसासाठी हिरवा रंग आणि अयशस्वी दिवसासाठी हलका लाल रंग कॅलेंडर मध्ये दिसतो. यशस्वीरीत्या सवय अंगी बानाविण्यासाठी आपल्याला ही हिरव्या रंगाची साखळी खंडीत न करता किमान ६६ दिवस पूर्ण करायची आहे.


११. आपण निवडलेल्या प्रत्येक सवयीसाठी आठवण करून देणाऱ्या अलार्मची सुविधा देखील यात आहे. त्यासाठी अप्लीकेशनमध्ये वरच्या बाजूला एक गजराच्या घड्याळाचे चिन्ह दिसेल तेथे क्लिक करा आणि अलार्म सेट करा.



किमान ६६ दिवस साखळी तुटू न देण्याचा प्रयत्न करा आणि मग पहा तुम्हाला फरक जाणवतो की नाही ते. सुरुवातीला खूप जास्त सवयी track करू नका. केवळ २-3 मुख्य सवयीनी सुरुवात करा आणि त्यानंतर हळू हळू नवीन सवयी track करा.

मला स्वत:ला हे अप्लिकेशन खूपच उपयोगी ठरले आहे आणि मी आजही अत्यंत नियमाने हे habitbull वापरतो. या साध्या सोप्या, उपयुक्त आणि चकटफू अप्लीकेशनचा फायदा नेटभेटच्या सर्व वाचकाना व्हावा म्हणून हा लेखनप्रपंच !!

धन्यवाद,
सलिल चौधरी
 Netbhet Youtube Channel

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment