300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Wednesday 8 July 2015

Tagged under: , , , ,

ड्रोन्सच्या सहाय्याने काढलेले अप्रतीम फोटो !


सध्या ड्रोन्सचा (Drones) बराच बोलबाला आहे. पोस्टाची पत्रे पाठवण्यापासून ते थेट शत्रूवर बॉम्ब हल्ले करण्यापर्यंत ड्रोन्सचे अनेक नवनविन उपयोग समोर येत आहेत. आतापर्यंत थोडी महाग असलेली ही ड्रोन टेक्नोलॉजी नुकताच सामान्य जनांच्या हातात येऊ लागली आहे. आणि त्यामुळे ड्रोन्सचे आणखी नवीन उपयोग अस्तित्वात येत आहेत. शेतांतील पिकांवर देखरेख करणे, अभयारण्यातील प्राण्यांवर लक्ष ठेवणे, अनधिकृत जंगलतोड करणारयावर  पाळत ठेवणे, नैसर्गिक आपत्तींच्या ठिकाणी पोहोचून मदत पुरवणे, माहिती गोळा करणे असे जगभर ड्रोन्सचे अनेक उपयोग केले जात आहेत.

ड्रोन्स म्हणजे छोटेखानी स्वयंचलित विमाने. विमान असलं तरी ते विमानासारख दिसत मात्र नाही. साधारणपणे एखादया पक्षी किंवा सशाच्या आकाराचे हे ड्रोन्स असतात. अशा ड्रोन्सचा वापर करून हवाई फोटोग्राफी (Aerial Photography) करणे हा एक नवा छंद आता फोतोग्राफर्सना लागलेला आहे. अशाच फोटोग्राफर्ससाठी एक  ड्रोन चित्रण स्पर्धा (Drone Photography) नुकतीच पार पडली. ड्रोनस्टाग्राम (Dronestagram) या ड्रोन चित्रणाला वाहिलेल्या एका वेबसाईटने ही स्पर्धा आयोजित केली होती.

पक्षांना आपलं जग हवेतून कसे दिसत असेल हे उलगडून दाखवणारे अनेक फोटो या स्पर्धेत आले होते. त्यापैकी काही निवडक विजेते फोटो येथे देत आहे. असे अनेक फोटो पाहण्यासाठी www.dronestagr.am या वेबसाईटला भेट दया. फोटोग्राफीची आवड असणारयांना ही वेबसाईट म्हणजे एक पर्वणीच आहे.








मजा आली ना असे अप्रतिम फोटो बघून. आपलं जग किती सुंदर आहे याची कल्पना हे फोटो पाहून येते. मला उगाचच वाटून गेलं की आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगाचे असे फोटो किती मोहक असतील . महाराष्ट्रातील  गड-किल्ले, डोंगर, समुद्र, पठार यांचे असे हवाई चित्रण बघायला खूप मजा येईल. लवकरच आपल्याकडेही ड्रोन्सचा वापर फोटोग्राफी साठी सुरु होईल, तेव्हा पहायला मिळतीलच महाराष्ट्राचे फोटो. तोपर्यंत आपण www.dronestagr.am वरील इतर फोटोंचा आनंद घेऊया !!

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.



0 comments:

Post a Comment