300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Monday 29 June 2015

Tagged under: , , , ,

पंढरीची वारी आता मोबाईलवर !



महाराष्ट्राला खूप मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. पंढरपूरची वारी ही त्या ठेव्याचा अविभाज्य घटक आहे. ८०० वर्षांपासून चालत आलेला हा दिंडी सोहळा म्हणजे विठ्ठल भक्तांसाठी पर्वणीच !

परंतु आताशा या धकाधकीच्या आयुष्यात सर्वच विठ्ठल भक्तांना दिंडीला जाणे शक्य होतेच असे नाही. कधी वयोमानानुसार, कामांच्या अडचणीमुळे, नोकरीच्या बंधनामुळे विठू माउलीची भेट शक्य होत नाही. अशा सर्व भक्तांसाठी स्वप्नील मोरे आणि त्याच्या इतर तरुण सहकाऱ्यांनी "फेसबुक दिंडी -A Virtual Dindi" २०११ साली सुरू केली. यावर्षी फेसबुक दिंडीच पाचवे वर्ष. यानिमित्तानॆ फेसबुक दिंडी टीम ने "Facebook Dindi" हे अॅपलीकेशन तयार केले आहे.
भावभक्ती आणि टेक्नोलॉजीचा असा अभूतपूर्व संगम साधणाऱ्या या अॅपलीकेशन मध्ये पालखी प्रत्यक्षात कुठे आहे हे Google Map वर दिसणार असून, पालखी मार्गातील विसावे , मुक्काम , गोल व उभी रिंगणे तसेच नीरा स्नान, धावा, मेंढ्यांचे रिंगण, शुभ्रवस्त्राच्या पायघड्या यासारख्या परंपरांची विस्तृत माहिती, लोकेशन, थेट वारीतले फोटो, विडीओ आणि पालखीपासून त्या ठिकाणचे अंतर दिसू शकणार आहे.


संत तुकाराम महाराज ट्रस्ट च्या सहाय्याने एक GPS मशीन पालखीच्या रथावर लावण्यात येणार आहे. त्यामुळे पालखीचा प्रवास आणि स्थान अचूक टिपता येणार आहे. "Intllinet Datasys" या कंपनीने हे यंत्र मोफत देऊ केले आहे.
फेसबुक दिंडी अप्लिकेशन Android Play Store मध्ये देखील उपलब्ध आहे. ते येथे क्लिक करून डाउनलोड करता येईल. Facebookdindi.com या वेबसाईटवर या अप्लिकेशनबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.
धन्यवाद,
सलिल चौधरी

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment