300x250 AD TOP

Powered by Blogger.

Labels

Labels

About

Formulir Kontak

Name

Email *

Message *

Popular Posts

Tuesday 1 October 2013

Tagged under: , , ,

सर्वोत्तम ऑनलाईन "खाजगी" रोजनिशी - ओहलाईफ.कॉम


“तुमच्या आयुष्याबद्दल खाजगीत लिहा” ही संकल्पना फारशी नवी नाही. नवीन वर्ष आलं, नवी कोरी डायरी हातात पडली की जानेवारीच्या १ तारखेपासून डायरी लिहिण्याची सुरसुरी अनेकांना येते आणि १० तारीख उलटून जायच्या आत ती संपलेली असते. परत नवीन वर्ष आले की पुन्हा तेच. अश्या प्रत्येक वर्षी मिळालेल्या / आणलेल्या  डाय-यांतली चार-पाच पाने भरून ती डायरी तशीच पडून राहाते पण एकही पूर्णपणे भरत नाही. समजा तुम्हाला अमूक एका वर्षी...अमूक एका महिन्यात..अमूक एका दिवशी काय केलं होतं हे शोधायचं झालं तर तुम्हाला त्या वर्षाची डायरी शोधून बहुतेक वेळा त्यातलं रिकामं पानच दृष्टीस पडेल. आताशा संगणक, स्मार्ट फोन्स हाताशी असल्याने आणि निवांत वेळ कमी असल्याने लिहावे काही लागतच नाही. सगळीच का्मे एका क्लिकवर होते. असेच जर असेल तर 

आपल्या सोयीनुसार ऑनलाइन डायरी लिहायची सोय का असू नये? पण ऑनलाइन म्हणजे सगळा खुल्लम खुल्ला मामला, म्हणजे आपलं खाजगी आयुष्य चव्हाट्यावर येणार की काय! येता जाता कोणीही ते वाचेल, कॉपी करून इतर कुठेतरी पेस्ट करेल, सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर होईल, त्यावर कॉमेंट्स केल्या जातील. कुठेतरी आपल्याच भूतकळाचं भूत आपल्यासमोर अवचित येऊन उभे राहील….नकोच रे बाबा!

पण या सगळ्यांना छेद देणारी….आपलं खाजगी आयुष्य खाजगीच ठेवणारी…..ते चव्हाट्यावर येऊ न देण्याची काळजी घेणारी एक ऑनलाइन सोय आपल्याकरता अस्तित्वात आहे आणि ती म्हणजे http://ohlife.com/. (ओह लाईफ.कॉम)



या वेबसाइट्वर आपला EMail address देऊन  रजिस्टर केल्यावर त्यांच्याकडून आपल्याला "How'd your day go?" अशी विचारणा करणारा ईमेल येतो. प्रत्युत्तर म्हणून आपण फक्त आपल्याला जे हवे ते टाईप करून त्या ईमेल ला रिप्लाय करायचा. तात्काळ तो मजकूर आपल्याला https://ohlife.com/latest इथे तारीखवार वाचता येऊ शकेल.

थोडक्यात हाताशी संगणक, स्मार्ट फोन आणि ओह्‌ लाइफ कडून आलेला "How'd your day go?" असा इमेल इतक्या सामग्रीवर आपण आपली डायरी आपल्याला वेळ मिळेल तेव्हा लिहू शकतो.

ओह लाईफ.कॉम ची वैशिष्ट्ये -
  • या सगळ्या नोंदी फक्त आपल्यालाच दिसू शकतात, आपला Email Id आणि Password दिल्याशिवाय त्या ऑनलाइन वाचता येणार नाहीत.
  • अगदी दोन दिवस वेळ नाही मिळाला लिहायला तरी हरकत नाही. ज्या तारखेचा मजकूर लिहायचा असेल त्या तारखेच्या "How'd your day go?"या इमेल वर जायचे आणि मजकूर टाईप करू पाठवून द्यायचा. इमेल पाठवताना एका पोस्टबरोबर एक फोटो देखील जोडून(attach) पाठवून देऊ शकतो.
  • तसेच त्या share करण्याची कोणतीही सोय दिलेली नसल्याने त्या कुठेही share होणार नाहीत याची खात्री आहे.
आपण लिहिलेल्या या सगळ्या नोंदी आपल्याला एकत्र हव्या असतील तर .txt फॉर्मॅट मध्ये export करुन घ्यायची पण सोय आहे. सहाजिकच ही Text फाईल searchable असते.

थोडक्यात, http://ohlife.com ही ऑनलाईन डायरी सोईची अश्याकरता आहे की दरवर्षी डायरी बदलत बसायला नको, एकेका वर्षाची एकेक डायरी बाळगत बसायला नको, संगणक / स्मार्ट फोन / टॅबलेट्स अश्या कोणत्याही डिव्हाइसवरून वापरता येते, कागदावरच्या मजकूरासारखे खाडाखोड न करता आधीचा मजकूर सहज बदलता येतो.

श्रेया रत्नपारखी

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

0 comments:

Post a Comment