मित्रहो, आज मी तुम्हाला गुगलकाकांच्या आणखीन एका उपयुक्त सेवेबद्दल माहीती देणार आहे. या गुगलसेवेचे नाव आहे "गुगल अलर्टस (Google alerts)".
सध्याचे युग हे माहीतीयुग म्हणुन ओळखले जाते. आपापल्या विषयाची तंतोतंत आणि अद्ययावत माहीती ज्याच्याकडे आहे तोच सर्वश्रेष्ठ समजला जातो. (म्हणुनच तर गुगल काका आजच्या युगावर राज्य करतात.). पुर्वीप्रमाणे फक्त सचोटीने आणि मेहनतीने काम करुन आता भागत नाही. मेहनतीबरोबरच स्मार्टवर्कलाही तितकेच महत्त्व आहे. या स्मार्टवर्क साठी हवे ज्ञान आणि आपापल्या क्षेत्रांतील नविन घडामोडींविषयी पुर्ण माहीती. गुगलकाकांची अलर्टस ही सेवा नेमकी याच कामी आपली मदत करते.
गुगल अलर्टस मध्ये आपण निवडलेल्या विषयांबद्दल (Keywords) इंटरनेटवर आलेली अद्ययावत माहीती आणि बातम्या आपल्या इमेल पत्त्यावर पाठवल्या जातात. गुगलच्या इतर सेवांप्रमाणेच ही सेवा मोफत (Free) आहे. गुगल अलर्टस मध्ये एका पेक्षा अधिक विषय नोंदवता येतात.
गुगल अलर्टस कसे वापरावे?
गुगल अलर्टस (Google Alerts) साठी येथे क्लिक करा.
येथे गुगल अलर्ट्सचा एक छोटासा फॉर्म दीसेल. (चित्रात पहा).

येथे तुम्हाला ज्या विषयासंबंधी माहीती हवी आहे तो लिहा. एका पेक्षा अधिक विषयांची माहीती हवी असल्यास प्रत्येकासाठी एक वेगळा अलर्ट बनवावा.
Type -
कोणत्या प्रकारची माहीती तुम्हास हवी आहे तो प्रकार येथे निवडता येइल. उदाहरणार्थ समजा तुम्ही वेबडीझाइन (Web Design) हा विषय निवडलात तर वेब डीझाइन बद्दल येणार्या बातम्या, त्याबद्दलचे ब्लॉगपोस्ट्स , विविध वेबसाईट्स वर आलेले अपडेट्स , त्याबद्दल प्रकाशीत झालेले वीडीओज किंवा गुगल ग्रुप्स मध्ये त्याबद्दल झालेली चर्चा यापैकी तुम्हाला हवा असलेला प्रकार निवडता येतो. येथे एक Comprehensive (कॉम्प्रीहेन्सीव) असा पर्याय आहे. तो निवडावा म्हणजे वरील सर्व प्रकारचे अपडेट्स तुम्हाला इमेलद्वारे मिळतील.
How often -
येथे इमेलद्वारे माहीती कधी हवी आहे ते निवडता येथे. त्यासाठी पुढीलप्रमाणे तीन पर्याय आहेत.
- as-it-happens - जेव्हा जेव्हा नविन माहीती इंटरनेटवर येइल त्तेव्हा त्वरीत तुम्हाला कळवीली जाइल.
- Once a day - दीवसातुन एकदा
- Once a week - आठवड्यातुन एकदा.
Type email -
येथे तुमचा इमेल पत्ता लिहा.
तुम्ही दीलेल्या इमेल पत्त्यावर एक कंन्फर्मेशन लिंक पाठविली जाइल (दीलेला इमेल पत्ता तुमचाच आहे याचा पडताळा करण्यासाठी) त्यावर क्लिक करा. आता तुमच्या क्षेत्रातील सर्व घडामोडींची माहीती मिळेल थेट तुमच्या इमेल बॉक्स मध्ये.
0 comments:
Post a Comment