
त्या कलाकाराने अशी चित्रे काढताना प्रचंड मेहनत घेतली असणार यात शंका नाही. खुपच वेळखाउ, आणि बारकाइचे काम आहे हे. पुढे कळलं की या प्रकारालाच अॅस्की आर्ट (ASCII - A-American S-Standard C-Code for. I-Information I-Interchange) असे म्हणतात.
आज मला एक अशी वेबसाइट सापडली आहे जी अशी चित्रे अगदी काही सेकंदात बनवुन देते. या वेबसाईटचे नाव आहे photo2text.com. (फोटोटूटेक्स्ट्.कॉम).



या वेबसाईटवर Browse बटणाच्या सहाय्याने तुमच्या कंप्युटरमधील कोणतेही चित्र (जास्तीत जास्त १ MB पर्यंत) अपलोड करा आणि मग Submit बटण दाबुन त्याची अॅस्की इमेज तयार करा.
या चित्राला नाव देउन ते संगणकावर .txt या फॉर्मॅट मध्ये सेव्ह करता येते त्याचप्रमाणे याची एक वेबलिंक ही बनवीली जाते जी तुम्ही मित्रांबरोबर शेअर करु शकता.
यासाठी कोणत्याही रजिस्ट्रेशनची आवश्यकता नसते.
Visit - photo2text.com
0 comments:
Post a Comment