(Rhett Dashwood) र्हेट डॅशवुड नामक एका ३२ वर्षीय ऑस्ट्रेलियन कमर्शीअल आर्टीस्टने गुगल अर्थच्या चित्रांमध्ये इंग्रजी लिपीची A to Z अक्षरे शोधुन काढली आहेत. त्याने फक्त ऑस्ट्रेलियातील स्टेट ऑफ व्हर्जीनीया या प्रांतातील चित्रांमध्येच या अक्षरांचा शोध घेतला.
गुगल अर्थ मध्ये संपुर्ण प्रुथ्वीचे चित्रीकरण करण्यात आले आहे. यामध्ये इमारती, नद्या, मैदाने, शेते इत्यादींमध्ये इंग्रजी अक्षरांचा आकार दाखवणार्या जागा डॅशवुड यांनी शोधुन काढल्या आहेत. याकामी त्यांना तब्बल सहा महीने लागले. गुगल अर्थ मधील प्रत्येक जागा अतीशय काळजीपुर्वक आणी बारकाईने न्याहाळुन त्यातुन ही अक्षरे शोधुन काढली आहेत.
तुम्हीदेखील बघा प्रयत्न करुन, गुगल अर्थच्या सहाय्याने महाराष्ट्र फिरुन त्यात मराठी अक्षरांची प्रतीरुपे दीसतात का ते! सर्व अक्षरे शोधता आली तर चांगलेच आणि नाही मिळाली तर किमान "महाराष्ट्र भ्रमण " तरी होइल.
(किंवा मग गणपतीचा किंवा साईबाबांचा चेहरा कुठे दीसतो का ते शोधा. असं काही मिळाले तर टीव्ही चॅनेलवाले (ईंडीया टीव्ही सारखे) तुम्हाला एका दिवसात ब्रेकींग न्युजद्वारे "फेमस" करतील.)






0 comments:
Post a Comment