पण मित्रांनो निराश होउ नका. ब्लॉगरची (blogger.com) एक सेवा आपल्याला सदैव ब्लॉगजगतात हजर राहण्यास मदत करते. आज आपण याच ब्लॉगरच्या सेवेची माहीती घेणार आहोत. त्या सेवेचे नाव आहे "schedule posts" म्हणजेच लेख केव्हा प्रकाशीत होणार याचे पुर्वनियोजन. याच्या उपयोगाने आपण आपल्या सोयीनुसार अनेक लेख लिहुन ठेवु शकतो आणि मग ते पाहीजे तेव्हा, पाहीजे त्या क्रमाने प्रकाशीत करु शकतो.
आवडली का ही कल्पना? वाटतेय ना उपयोगाची?
पुर्वनियोजीत वेळेवर ब्लॉग प्रकाशीत करण्यासाठी काय करावे?
१. तुमच्या blogspot.com वरील ब्लॉग पोस्ट एडीटर मध्ये डाव्या बाजुला खाली "post options" असे लिहिलेली लिंक असेल. त्यावर क्लिक करा. २.तेथे खालील चित्रात दाखवील्याप्रमाणे वेळ आणि तारीख लिहिलेले दोन रकाने दिसतील. त्यामध्ये लेख जेव्हा प्रकाशीत करावयाचा असेल तेव्हाची तारीख आणि वेळ लिहा.
३. आता तुमचा लेख लिहुन घ्या आणि "Publish" हे बटण दाबुन प्रकाशीत करा. आता हा लेख तुम्ही दीलेल्या तारीख आणि वेळेपर्यंत Drafts ड्राफ्टस मध्ये राहील. आणि त्या तारखेला आपोआप प्रकाशीत होइल. अगदी तुम्हाला लॉग्-इन करण्याची देखील आवश्यकता नाही.
मित्रांनो आता तुम्हाला ब्लॉगींग करण्यापासुन कोणीही अडवु शकणार नाही.

0 comments:
Post a Comment